मोबाईल टॉवर केबलसाठी खोदाई वृक्षाच्या मुळावर

। खोपोली । वार्ताहर ।
शहरातील नवीन वसाहत भागात लोकवस्ती मधून मोबाईल टॉवर साठी खोदाई करण्यात येत असून खोदकाम करताना वृक्षांच्या मुळावरच घाला घालण्यात येत असल्याने वृक्षप्रेमी नाराज आहेत. खालापूर शहरात नगरपंचायत हद्दीत बहिरिचा माळावर नवीन मोबाईल टॉवर बसविण्यात येत आहे. यासाठी जमिनीखालून केबल टाकण्यासाठी तीन ते चार फूट खोदकाम करण्यात येत आहे. लोकवस्ती नजीक घराच्या बाजूने तसेच जुन्या वृक्षालगत खोदाईचे काम सुरू असून तेथील रहिवाशांचा विरोध मोठ्या प्रमाणात होत आहे. काही जागरूक नागरिकांनी कामाला विरोध केला. खोदाई करताना ठेकेदारांनी सुरक्षेबाबत काहीच उपाययोजना केल्या नसून ऐन पावसाळ्यात वृक्षाच्या मुळाजवळील माती काढण्यात येत असल्याने महाकाय वृक्ष कोसळण्याची शक्यता आहे. दुर्दैवाने अशी घटना घडल्यास त्याठिकाणी महावितरणची विद्युत वाहिनी आणि घरावर वृक्ष कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते.

Exit mobile version