क्रीडा संकुलाच्या स्टँडला क्रीडाप्रेमी स्व. ज्योतिबा शिंदेंचे नाव

| माथेरान | वार्ताहर |
गेल्या पाच दशकांपासून येथील वीर हुतात्मा भाई कोतवाल क्रीडा संकुलात टेनिस बॉलच्या क्रिकेटच्या सामन्यांचे आयोजन स्व. ज्योतिबा रामचंद्र शिंदे यांच्या माध्यमातून केले जात होते. त्यांच्या पश्‍चात त्यांची आठवण कायमस्वरूपी नवोदित खेळाडूंना असावी या या संकुलातील आसनव्यवस्था असणार्‍या स्टँडला स्व. ज्योतिबा शिंदे यांचे नाव माजी नगरसेवक प्रसाद सावंत यांनी दिल्यामुळे त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

स्व. ज्योतिबा शिंदेंनी याच मैदानावर मुंबई, पुण्यातील खेळाडूंना खेळण्याची संधी प्राप्त करून दिली होती. एक क्रीडाप्रेमी म्हणून ज्योतीबा शिंदेंकडे पाहिले जायचे. किशोर क्रिकेट संघ हा त्यांनी स्व. मित्र किशोर रांजाणे या मित्राच्या नावाने सुरू केला होता.आज या संघालासुध्दा पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. ज्योतीबा शिंदेंनी खेळासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन गोल्डन स्टार संघाचे सर्वेसर्वा तथा माजी नगरसेवक प्रसाद सावंत यांनी स्व. ज्योतीबा शिंदे स्टँड असे नामकरण केल्यामुळे सर्व क्रीडाप्रेमी तसेच नागरिकांमधून त्यांचे कौतुक होत आहे.

Exit mobile version