| संभाजीनगर | प्रतिनिधी |
विधानसभा निवडणुकीच्या दिवशी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पूर्व विधानसभा मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्यात वाद झाला होता. याप्रकरणी भाजप पदाधिकार्यांच्या तक्रारीवरुन जलील यांच्यावर गुरुवारी (दि. 21) रात्री उशिरा अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (दि.20) मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी जलील आणि भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस जालिंदर शेंडगे हे पंडित नेहरू महाविद्यालयातील बूथवर आपसात भिडले होते. यानंतर शेंडगे यांनी गुरुवारी रात्री उशिरा पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानुसार जलील यांच्यावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या तक्रारीत म्हटले आहे की, भारतनगर परीसरात केंद्रावर मतदान सुरु असताना जलील 15 ते 20 जणांसह तेथे आले.