समाज क्रांती आघाडी संघटनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील मेढेखार, काळवडखाडी, पिंटकिरी, कातळपाडा, कुसूंबळे, खातविरा गावातील शेतकर्यांना शेतीपुरक प्रकल्पाचे अमिष दाखवूल नऊ भांडवलदार कंपन्यांनी कवडीमोल भावात जमिनी खरेदी केल्या. आज 17 वर्षे उलटूनही या जमिनीवर प्रकल्प उभा राहिला नाही.
परिणामी, या जमिनी ओसाड राहिल्याने तेथे कांदळवन तयार झाले असून त्या नापीक झाल्या आहेत. त्यामुळे अशा बेजबाबदार भांडवलदारांना धडा शिकविण्यासाठी, जमिनी पुन्हा ताब्यात घेण्यासाठी व नुकसान भरपाई मिळविण्यासाठी समाज क्रांती आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. सकाळी साडेदहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून या मोर्चाला सुरुवात झाली.