| स्पेन | वृत्तसंस्था |
17 वर्षीय स्पॅनिश फुटबॉलपटू लॅमीन यमालच्या वडिलांना बार्सिलोनाजवळील पार्किंगमध्ये चाकूने भोसकल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना गंभीर दुखापत झाली असली तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे. या चाकू हल्लेच्या घटनेनंतर पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. ही घटना मातारोच्या रोकाफोंडा शेजारच्या फ्रँक मार्शल स्ट्रीटवरील कार पार्कमध्ये बुधवारी रात्री 9 ते 10 च्या दरम्यान घडली.
मातारोच्या रोकाफोंडा शेजारच्या फ्रँक मार्शल स्ट्रीटवरील कार पार्कमध्ये बुधवारी रात्री 9 ते 10 च्या दरम्यान हल्लेखोरांनी मौनीर नसरौईवर अनेक वेळा चाकूने वार करुन पळ काढला. यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत कॅन रुती हॉस्पिटलच्या आपत्कालीन कक्षात नेण्यात आले. मात्र, आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. या हल्ल्याचा मातरो पोलीस तपास करत आहेत. या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी पूर्वीच्या वादातून हा वार झाला असावा, असा अंदाज आहे.