। उरण । वार्ताहर ।
राष्ट्रवादी महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांच्या वाहनावर अज्ञात गूंडांकडून दगडफेक करण्यात आली. हा प्रकार द्रोणागीरी नोडमध्ये रिलायन्स रस्त्यावर झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हल्यात कोणीही जखमी झाले नाही. परंतू गाडीचे नुकसान झाले आहे. घटनेची माहीती मिळताच परिमंडळ 2 चे उपायुक्त शिवराज पाटील, उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रात्रीची वेळ असल्याकारणाने भावना घाणेकर व त्यांच्या चालकांना अज्ञात हाल्लेखोरांना ओळखता आले नाही.







