पुण्यात तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला

रील बनवून केले व्हायरल

। पुणे । वृत्तसंस्था ।

पुणे परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. यात तो गंभीर जखमी झाला आहे. तर, हल्ल्यानंतर तरुणांनी मारहाणीचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

पुण्याच्या वाघोलीतील बकोरी फाट्यावरील जय महाराष्ट्र खाऊ गल्लीत प्रमोद देशमुख या तरुणावर चार जणांनी धारदार कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात तो तरुण गंभीर जखमी झाला आहे. मात्र हल्ल्यानंतर तरूण तेवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी त्या मारहाणीचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. धक्कादायक गोष्ट म्हणजे या घटनेमधील चारही आरोपी अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही घटना रविवारी (दि. 28) रात्रीच्या सुमारास घडली असून याप्रकरणी लोणीकंद पोलीस अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version