वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार

। पुणे । प्रतिनिधी ।

पुणे-सातारा रस्त्यावर वैमनस्यातून एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी (दि. 17) रात्री अकराच्या सुमारास उदय हरिदास वैराळ (22) पुणे-सातारा रस्त्यावरील शिल्पा हाॅटेलजवळ थांबला होता. दरम्यान, आरोपी सिद्धार्थ शिगवण, सोनू शिंदे साथीदारांसह तेथे आले. त्यांनी दहशत माजवून त्याला शिवीगाळ केली. आरोपी शिगवण, शिंदे यांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. वैराळ याचा आरोपींशी वाद झाला होता. त्यामुळे पूर्ववैमनस्यातूनच आरोपींनी वैराळवर हा हल्ला केला. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात सिद्धार्थ अशोक शिगवण, सोनू शिंदे यांच्यासह सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version