आट्यापाट्या खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर

| सुकेळी | प्रतिनिधी |

कोकणवासियांचा महत्वाचा सण मानला जाणाऱ्या होळी सणाची धुमधाम रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यात जोरदार सुरु आहे. परंतु, होळी सणाच्या काही दिवस अगोदर खेळल्या जाणाऱ्या पारंपरिक अशा आट्यापाट्यांचा खेळ हा पुर्णतः दुर्मिळ होण्याच्या मार्गावर दिसुन येत आहे कोठेही हा खेळ खेळतांनाचे चित्र दिसत नसल्यामुळे आट्यापाट्यांचा खेळ हा नामशेष होत चालला आहे. आट्यापाट्या हा महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट असा मैदानी खेळ आहे. या खेळाचे खास वैशिष्ट्‌‍य म्हणजे एका संघातील खेळाडूंनी दुसऱ्या संघातील खेळाडूंना ठराविक जागेमध्ये म्हणजेच रेषा मारलेल्या चौकोनी खणामध्ये अडविणे व अडविलेल्या खेळाडुंना हुलकावणी देऊन सटकुन जाणे असे या खेळाचे खास स्वरुप आहे कोकणात हा खेळ होळी सणाच्या 10 दिवस अगोदरपासूनच सुरू होतो. तसेच आढ्यापाट्या हा खेळ तर ग्रामीण भागामध्ये नावजलेला खेळ म्हणून मानला जातो. परंतु, सद्यपरिस्थितीत आट्यापाट्या हा खेळ कोकणातुन हद्दपार होत आहे. पुर्वंजांपासुन जपुन ठेवण्यात आलेला वारसा हा आता नामशेष होत आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारने या खेळासाठी विशेष आर्थिक निधी उपलब्ध करून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत या खेळाचा समावेश केल्यास या खेळाला नक्कीच चांगले दिवस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Exit mobile version