कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील वरई येथील एकाच गावातील व्यक्तींमध्ये राजकीय वादातून जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल झाला आहे. लाखरन रोडवर गाडी अंगावर घुसवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा कर्जत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला असून, या घटनेत कोणीही जखमी नसून, पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही.
कर्जत पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 08/05/2022 रोजी 00:30 वा च्या सुमारास मौजे वरई तर्फे निड,गावच्या हददीत महादेव पाटील यांचे फार्महाउच्या समोर,लाखरण- वरई तर्फे निड रोडवर वैभव रमेश जाधव आणि गाडी मालक हे एकमेकांचे परिचयाचे असून एकाच गावात राहतात. वैभव जाधव आणि महेश देवराम जाधव हे चुलत भाऊ असे दोघे त्याच्या शेतात पाण्याचा पंप बंद करुन पायी चालत रस्त्याने घरी वरई तर्फे निड येथे येत असताना महादेव पाटील यांचे फार्म हाउसच्या समोर आले. त्यावेळी मारुती स्विफ्ट चालक यांनी दारुच्या नशेत काहीएक कारण नसताना लाखरण बाजुकडुन त्याच्या ताब्यातील स्वीफ्ट कार जोरात चालवित फिर्यादी यांच्या पाठीमागुन येवुन फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याच्या उददेशाने स्वीफ्ट कार फिर्यादी यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला.
याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपाधीक्षक विजय लगारे आणि कर्जत पोलीस ठाण्याच्या निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आहे काय, याची खात्री केली. कर्जत पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीपान सोनावणे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.