घातपात असल्याचा कुटुंबियांचा आरोप
| लातूर | वृत्तसंस्था |
लातूर येथील वस्तीगृहात राहणाऱ्या 15 वर्ष वयाच्या मुलीने वस्तीगृहाच्या केला होता. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यानंतर परिवारातील नातेवाईक विविध सामाजिक संघटना यांनी लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात गर्दी केली. ही आत्महत्या नव्हे तर, घातपात आहे, अशी शंका नातेवाईकांकडून व्यक्त करण्यात आली. दोषी लोकांना शासन होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी नातेवाईकांनी भूमिका घेतली होती. मृतदेहाची उत्तरीय तपासणी लातूर झाल्यानंतर ही पुन्हा सोलापूरला होत आहे. या घटनेला 35 पेक्षा अधिक तास झाले आहेत. मृतदेह संध्याकाळी सोलापूरकडे पाठवण्यात आला.
सायली सिद्धार्थ गायकवाड ही 14 ते 15 वर्षाची मुलगी, नववी वर्गात शिकत होती. काहीच दिवसांपर्वी आठवीचा निकाल लागला. लातूरच्या महात्मा गांधी विद्यालय येथे तिचे शिक्षण सुरू होते. मागील एक वर्षापासून ती लातूरच्या कस्तुरबा कन्या छात्रालयात राहत होती. नववीच्या वर्गात जाण्याचा उत्साह तिच्यात होता. यासाठी लातूर तालुक्यातील आपल्या गावावरून ती लातूरला दाखल झाली. दोनच दिवसापूर्वी पहाटेच्या वेळी तिने वसतीगृहाच्या दुसऱ्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला तात्काळ लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. उपचार सुरू असताना शुक्रवारी (दि.28) तिचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती कळताच सायलीचे आई-वडील, आजी-आजोबा लातूर येथे आले. अनेक सामाजिक संघटनांनी लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाकडे धाव घेतली. दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी करण्यात येत होती. विवेकानंद पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत होते. लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात पोस्टमार्टम करण्यात आले. मात्र, नातेवाईकांनी इन कॅमेरा पोस्टमार्टम करण्याची मागणी लावून धरली. घातपाताची शक्यता व्यक्त केली जात होती, जोपर्यंत मागणी मान्य केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली. पोलिसांनी आता मृतदेह उत्तर तपासणीसाठी सोलापूरकडे पाठवला आहे.