वायर चोरीचा प्रयत्न

| माणगाव | वार्ताहर |

माणगाव येथील घोटवळ येथे इंडस टेलिकॉम कंपनीच्या टॉवरमधील वायरची चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी तक्रारदार यांच्या ताब्यात असलेल्या इंडस टेलिकॉम कंपनीच्या टॉवर क्र.1053465 मधील एमसीयु व ओडीसीचा लोखंडी दरवाजा उघडुन वायरची चोरी करण्याचा प्रयत्न करताना आरोपी सापडला. या आरोपीला अटक करण्यात आली असून माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस हवालदार दर्शन दोडकुलकर करीत आहेत.

Exit mobile version