महाशिवरात्री निमित्त हर हर महादेव च्या जयघोषात शेकडो भाविकांनी घेतले भगवान शिव शंकराचे दर्शन
| आगरदांडा | वार्ताहर |
मुरुड शहरातील प्राचीन काळातील भोगेश्वर पाखाडी मधील शिव मंदिरात व कल्याणी हॉस्पीटल मधील मंदिरात महाशिवरात्री निमित्त हर हर महादेव च्या जयघोषात भाविकांनी शिव शंकराचे भक्तीभावाने दर्शन घेतले. यावेळी विदेशी पाहुण्यांनी कल्याणी हॉस्पीटल मधील शिवमंदिरात शिव शंकराचे दर्शन घेतले आणि प्रसादाचा लाभ घेतला. आज महिला दिन असल्याने यावेळी राज कल्याणी, मयुर कल्याणी व त्यांच्या परिवारानी महिला विदेशी पाहुण्यांचे स्वागत केले.
यावेळी सकाळी मंदिरात भगवान शिवलिंगाची विशेष पुजा करण्यात आली गाईचे दूध, तुप, शेण, गोमुत्र, दही लावुन शिवलिंगला अभिषेक करण्यात आले. शिवलिंगावर धोत्रा फुल ,सफेद फुले,बेल वाहुन मनोभावे पूजा करण्यात आल्या नंतर होम हवन करण्यात आल्यानंतर दर्शनासाठी मंदिर भाविकांना खुले करण्यात आले.