। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
शिक्षण महर्षी दादासाहेब लिंमये यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून पडसरे येथील आश्रमशाळेच्यावतीने इयत्ता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांनी सुशोभित पणत्या याचबरोबर गांडूळ खत, जीवामृत, दशपर्णी अर्क तयार करून दिवाळी स्टॉलच्या माध्यमातून विक्रीसाठी मांडण्यात आले होते.
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी या सुशोभित पणत्या तयार करण्यासाठी साध्या पणत्या विक्री करून त्यांना रंगकाम करून आकर्षक पणत्या बनविल्या. यातील एक पणती जोड 25 रु. विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. यावेळी चिमुकल्यांनी तयार केलेल्या पणत्या खरेदीसाठी ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या दिवाळी स्टॉलच्या माध्यमातून 150 पणत्या जोडची विक्री झाली असे नीलम गुरव यांनी सांगितले. यावेळी शंतनू लिमये, आयबीटी निर्देशक नीलम गुरव, निलेश फाटे व विद्यार्थी उपस्थित होते.
आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी रंगकाम करून तयार केलेल्या पणत्या खूप आकर्षक आणि देखण्या आहेत. त्यांच्या या कलेचे कौतुक करू तेवढे कमीच आहे.
– सुलतान बेनसेकर, नगरसेवक, पाली