महड मंदिरात आकर्षक रांगोळ्या

| पाताळगंगा | वार्ताहर |

माघी गणपती उत्सवानिमित्त महड मंदिरात सकाळपासून भाविकांच्या दर्शनासाठी मंदिरात रांगा लागल्या होत्या. गणेश जयंतीनिमित्त भव्य दिव्य अशी धान्याची रांगोळी साकारली होती. सुंदर रांगोळी रवि आचार्य आणि मंगेश देशमुख तुळशीराम ठोंबरे-टेंभरी, सचिन पाटील, स्वरा पाटील, स्नेहल देशमुख, साक्षी देशमुख, कविता देशमुख, तसेच, रांगोळीसाठी अर्थसहाय्य नित्यराज चुडासमा यांनी केले. या रांगोळीचे अनावरण नायब तहसीलदार पवार तसेच, विश्‍वस्थ श्रीधार्थ जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. रांगोळी काढण्यासाठी 80 किलो धान्यांचा वापर करण्यात आला. रांगोळीसाठी साबुदाणे, कणी, बाजरी, तीळाचा वापर करण्यात आला. या रांगोळीमध्ये राम, श्री समर्थ रामदास स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज, एकविरा यांची रांगोळी रेखाटण्यात आली.

Exit mobile version