| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने संघ जाहीर केला आहे. वनडे कसोटीतून निवृत्ती घेतलेल्या डेव्हिड वॉर्नरच्या जागी स्टीव्ह स्मिथ कसोटीत सलामी करताना दिसणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे संघाची कमानही तो सांभाळणार आहे. नियमित कर्णधार पॅट कमिन्स वनडे मालिका खेळणार नाही. त्याला या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. संघ 17 जानेवारीपासून घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे.
ऑस्ट्रेलिया संघ
पहिल्या कसोटीसाठी:
पॅट कमिन्स (कर्णधार), उस्मान ख्वाजा, मॅट रेनशॉ, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी, नॅथन लियॉन, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, स्कॉट बोलँड आणि कॅमेरॉन ग्रीन.
एकदिवसीय संघ:
स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन ॲबॉट, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, ॲरॉन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, लान्स मॉरिस, झ्ये रिचर्डसन, मॅट शॉर्ट आणि ॲडम झाम्पा.