आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची घोषणा
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
ऑस्ट्रेलियाला 2032 च्या ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन येथे ही स्पर्धा होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने बुधवारी याची अधिकृत घोषणा केली. आयओसीच्या 138 व्या मोसमात 2032 उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी ब्रिस्बेनला मिळाली आहे.
ऑस्ट्रेलियातील ब्रिसबेन शहराला 2032 च्या ऑलम्पिक स्पर्धा खेळवण्याचा मान देण्यात आला आहे. हा मान ब्रिस्बेनला मिळणार असल्याची चर्चा आधीपासूनच होती. पण बुधवार समितीने दिलेल्या निर्णयात यावर शिक्कामोर्तब झाले. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन यांनी व्हिडीओ कॉन्फ्रसमध्ये दिलेल्या माहितीत म्हटलं, ‘आम्हाल याआधी ऑलम्पिक खेळ कसे खेळवायचे, कसं आयोजन करायचं याचा अनुभव आहे. 2024 मध्ये पॅरिस आणि 2028 मध्ये लॉस एंजेलीसमध्ये ऑलम्पिक खेळ होणार आहेत. त्यानंतर 2032 साठी ब्रिसबेनने नव्या बिडिंग सिस्टममध्ये विजय मिळवला. त्यामुळे हा मान आम्हाला मिळाला आहे.
2017 मध्ये, आयओसीने 2024 ऑलिम्पिकचे होस्टिंग पॅरिसला आणि 2028 ऑलिम्पिकचे आयोजन लॉस एंजेलिसकडे दिले आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये आयओसीने सांगितले की, 2032 ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी ब्रिस्बेन योग्य उमेदवार आहेत. वास्तविक, ब्रिस्बेनला आयओसीतर्फे सर्वाधिक पसंती देण्यात आलेली असूनही कतारने 2032 क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्याची इच्छा दर्शविली होती. आयओसीच्या 15 कार्यकारी मंडळाने 10 जून रोजी ब्रिस्बेनला निवडणुकीसाठी एकमेव उमेदवार म्हणून मान्यता दिली.
तिसर्यांदा मिळाला मान
ऑलम्पिक सारखी भव्य स्पर्धा खेळवण्याचा मान ऑस्ट्रेलियाला तिसर्यांदा मिळाला आहे. याआधी 1956 मध्ये ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे ऑलम्पिक खेळ खेळवण्यात आले होते. तर त्यानंतर 2000 साली सिडनी येथे ऑलम्पिक खेळांचे आयोजन झाले होते. त्यानंतर आता 32 वर्षांनी पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाला हा मान मिळाला आहे.