ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय

महिला एकदिवसीय क्रिकेट, जेमिमा रॉड्रिग्जची अर्धशतकी खेळी ठरली व्यर्थ

| मुंबई | वृत्तसंस्था |

भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने हा सामना 6 गडी राखून जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलियन महिला संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियासाठी शानदार फलंदाजी करणाऱ्या फोबी लिचफिल्डची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. फोबी लिचफिल्डने 89 चेंडूत 78 धावांची शानदार खेळी केली.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकांत 8 गडी गमावून 282 धावा केल्या होत्या. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना जेमिमा रॉड्रिग्जने सर्वाधिक 82 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान जेमिमाने 7 शानदार चौकार लगावले. याशिवाय यास्तिका भाटियाने 49, रिचा घोषने 21 आणि दीप्ती शर्माने 21 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना गार्डनर आणि जॉर्जिया वेरहॅमने प्रत्येकी 2 फलंदाज बाद केले.

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने 46.3 षटकांत 4 गडी गमावून 281 धावांचे लक्ष्य 285 धावा करुन गाठले. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना फोबी लिचफिल्डने सर्वाधिक 78 धावा केल्या. याशिवाय एलिस पेरीने 75 धावा, बेथ मुनीने 42 धावा आणि ताहलिया मॅकग्राने 68 धावा केल्या. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना रेणुका सिंग, पूजा, दीप्ती आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला .

कसोटी सामन्यात पराभव पत्करल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये शानदार पुनरागमन केले आहे. या सामन्यात भारतीय संघाची गोलंदाजी काही खास नव्हती आणि सर्व गोलंदाज गडी बाद करण्यासाठी संघर्ष करताना दिसत होते. आता मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना 30 डिसेंबर रोजी वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

Exit mobile version