। न्युयॉर्क । वृत्तसंस्था ।
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जॉश हेजलवूडने ऑस्ट्रेलिया स्कॉटलँडविरूद्धच्या सामन्यात सेटिंग करणार असल्याची हिंट दिली. या सामन्यानंतर इंग्लंडचे आव्हान ग्रुप स्टेजमध्येच संपुष्टात येण्याची शक्यता आहे. हेडलवूड नामिबियाविरूद्धच्या सामन्यानंतर बोलताना म्हणाला की, या स्पर्धेत तुमचा इंग्लंडविरूद्ध पुन्हा एकदा सामना होण्याची शक्यता आहे. तो सर्वोत्तम संघापैकी एक संघ आहे. आम्ही टी-20 मध्ये यांच्याविरूद्ध संघर्ष करतो. त्यांना आम्ही स्पर्धेतूनच बाहेर काढू शकलो तर आम्हाला विश्वचषक जिंकण्याची चांगली संधी आहे.
हेजलवूड पुढे म्हणाला की, आम्ही इंग्लंडला स्पर्धेतून बाहेर काढण्याच्या स्थितीत आहोत का नाही हे पाहणे रंजक ठरणार आहे. मला माहिती नाही आम्ही आहोत की नाही. आम्ही याबाबत चर्चा केली आहे किंवा नाही किंवा आम्ही तसे करण्याचा प्रयत्न करणार आहोत की नाही हे ठरवणे माझ्या हातात नाही. हेजलवूडने जरी मुद्दाम कमी मार्जिनने हरण्याकडे इशार केला असला तरी अशा कृतीचा त्यांच्या कर्णधारावर मोठा परिणाम होऊ शकतो.