| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
रिक्षा थांबवल्याचा राग मनात धरून स्कुटीवरील दोघांनी रिक्षाचालकाला दगडाने आणि हेल्मेटने मारहाण केल्याची घटना सहा ऑगस्ट रोजी बालाजी कॉम्प्लेक्ससमोरील रोड कळंबोली येथे घडली. याप्रकरणी 10 ऑगस्ट रोजी सुजान खान, कौशल खान (रा. तळोजा) यांच्याविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
6 ऑगस्ट रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास रिक्षाचालक ऋषिकेश दिनकर राठोड हे त्याचे रिक्षा मुंब्रा पनवेल हायवेने बालाजी कॉम्प्लेक्स समोरील रोड कळंबोली येथे प्रवासी भाडे सोडण्यासाठी थांबले होते. पाठीमागे पिकअप वाहन आणि त्याच्या पाठीमागील स्कुटी क्रमांक 03 इवाय 1473 ने ठोकर मारल्याने रिक्षा चालक यांना स्कुटीवरील आरोपी सूजान खान आणि कौशल खान यांनी शिवीगाळ केली आणि दगडाने आणि हेल्मेटने मारहाण करून त्यांना जखमी केले.
रिक्षा चालकाला हेल्मेटने मारहाण
