कर्मचाऱी निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घ्या- महावितरण

| मुंबई | प्रतिनिधी |

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महावितरणमधील जे कर्मचारी 1 सप्टेंबर 2014 रोजी कर्मचारी निवृत्ती वेतन-1995 या योजनेचे सदस्य आहेत. तसेच या योजनेंतर्गत निवृत्ती वेतन प्रत्यक्ष वेतनावर घेण्यासाठी इच्छूक आहेत, अशा कर्मचार्‍यांनी आपला अर्ज संबंधित कार्यालयांमध्ये जमा करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

सन 1995 पासून सर्व कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्या भविष्य निर्वाह निधी बाबतची सर्व माहिती सचिव, म.रा.वि. मंडळ, निर्वाह निधी विश्‍वस्त मंडळ या विभागाकडून त्यांच्या पोर्टलवर (https://cpf1.mahadiscom.in/CpfWebProject/) CPF HR Report मध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने दि. 1 सप्टेंबर 2014 पूर्वी सेवानिवृत्त कर्मचार्‍यांसाठी निवृत्ती वेतनासंबंधीचा पर्याय निवड करण्याकरिता संयुक्त पर्यायी नमुना अर्ज त्यांचे portal (https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/member Interface Pohw/) वर जाहीर केलेला आहे. महावितरण कंपनीमधील भविष्य निधी अधिनियमानुसार निवृत्ती वेतनास पात्र असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत माहिती, नव्याने लागू होणार्‍या निवृत्ती वेतन संदर्भात माहिती, संबंधित कर्मचार्‍यास निवृत्ती वेतन योजनेकरिता भरावी लागणारी अंदाजित रक्कम आणि नव्याने लागू होणारी निवृत्ती वेतनाची अंदाजित रक्कम इत्यादी बाबतची माहिती सीपीएफ़ पोर्टलवर उपलब्ध आहे.

दि.1 सप्टेंबर 2014 पूर्वी झालेले व सद्यस्थितीत कार्यरत कर्मचारी तसेच दि.1 सप्टेंबर 2014 नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांनी संयुक्त पर्यायी अर्ज दि.27 पर्यंत संबंधित महावितरणच्या संबंधित मानव संसाधन विभाग प्रमुखाकडे सादर करावा लागेल. संयुक्त पर्याय अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत पर्यायात बदल करता येणार नाही .

Exit mobile version