शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्या

| माणगाव | वार्ताहर |

मध्यवर्ती प्रशासकिय भवन माणगाव येथे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा शुक्रवारी (दि.15) घेण्यात आली. या प्रशिक्षण वर्गासाठी प्रमुख मार्गदर्शक उपविभागीय कृषि अधिकारी, माणगाव आनंद कांबळे यांनी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत प्रत्येक क्लस्टरमध्ये 25 शेतकरी गट स्थापन करण्यात आले. प्रत्येक गटांसाठी या प्रकल्पांतर्गत उत्पादन पद्धतीवर आधारित असणारे विविध प्रकल्प, एकात्मिक शेती पद्धती, पशुसंवर्धन, मत्स्यसंवर्धन, अवजारे बँक, सेंद्रिय शेती, सूक्ष्मसिंचन इत्यादी बाबींसाठी असणारे अनुदान, प्रस्ताव कशा पद्धतीने तयार करायचे व उत्पादित शेतमालाला शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत बाजारपेठ उपलब्ध करणे, तसेच गटांना पीक उत्पादन पद्धतीवर आधारित प्रकल्प तयार करणे याबद्द्‌‍ल मार्गदर्शन केले.

यावेळी जितेंद्र जोशी, मंडळ कृषी अधिकारी गोरेगाव एस.बी. ससाने, मंडळ कृषी अधिकारी इंदापूर एस.आर.नलावडे, कृषी पर्यवेक्षक के.जी.शिंदे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रमोद शिंदे व तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यक तसेच, तालुक्यातील विविध शेतकरी गटांचे अध्यक्ष, सचिव व प्रगतशील शेतकरी असे एकूण 160 शेतकरी उपस्थित राहून या प्रशिक्षण वर्गाचा लाभ घेतला.

Exit mobile version