पर्यावरण वाचविण्यासाठी नदीतील प्रदूषण टाळा

खालापूर तहसीलदार तांबोळी याचे प्रतिपादन

| पाताळगंगा । वार्ताहर ।

जिल्हाधिकारी, कर्जत विभागीय प्रांताधिकारी, खालापूर तहसिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार कार्यालय खालापूर, पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट व पिल्लेज् महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चला जाणूया नदीला’ या अभियानाची जनजागृती मोहीम शिबीर रसायनीमधील पिल्लेज् महाविद्यालयात पार पडले. शिबीर पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण जाधव यांच्या आयोजनातून संपन्न झाले.


यावेळी तांबोळी म्हणाले की, पर्यावरण वाचविण्यासाठी नदीतील प्रदूषण टाळणे गरजेचे असून विद्यार्थ्थांनी आपल्या दैनंदिन जीवनातील प्लास्टीकचा वापर कमी करा, तसेच नदीचे महत्त्व जाणून घेत नदीतील प्रदुषण कमी करण्यासाठी आपआपल्या परिने जनजागृती करावी असे ते म्हणाले. याप्रसंगी अश्‍वनाथ खेडकर, उमा मुंढे, विठ्ठल पाचपुंडे, सुनील कदम, संजीव बनोट, लता मेनोन, अभिजित लोहीया, विपीन चौव्हान, राजेश पाटील, अमित देवघरे, अरुण जाधव आदीप्रमुखासह मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

Exit mobile version