खेळात करिअर घडवायचे असेल तर स्मार्टफोन टाळा

क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांचा सल्ला

। मुंबई । प्रतिनिधी ।

खेळात करिअर घडवायचे असेल, तर स्मार्ट फोन वापरणे टाळले पाहिजे, असा सल्ला द्रोणाचार्य पुरस्कार विजेते क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांनी सुनीता देवधरकर-कळंबे षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळ्यात दिला. लाड व सदानंद शेट्ये यांच्या हस्ते सुनीता यांचा सन्मान करण्यात आला.

संपर्काकरिता फक्त साधा फोन वापरण्यास हरकत नाही. तरच तुम्ही तुमचे ध्येय निश्‍चित गाठू शकता. मी प्रशिक्षक असताना मुंबई क्रिकेट संघाकरीता हा प्रयोग केला त्याचा फायदा झाला, असेही पुढे ते म्हणाले. महर्षी दयानंद स्पोर्टस् क्लबने महर्षी दयानंद महाविद्यालयात या सोहळ्याचे आयोजन केले होते. गौरवमूर्ती देवधरकर यांनी आपल्या भाषणात उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले. यानिमित्ताने महर्षी दयानंद महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी रमाकांत मोरे यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. यावेळी माया मेहेर, छाया शेट्टी, शैला रायकर, आशा गायकवाड, तारक राऊळ, सिताराम साळुंके, सुनील जाधव, संजय सूर्यवंशी, अतुल रानडे यांच्या बरोबरीने मोठ्या संख्येने कबड्डी खेळाडू व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जया शेट्टी यांनी केले.

Exit mobile version