चिरनेर येथील महाबँकेला टाळे

| उरण | वार्ताहर |
बँक ऑफ महाराष्ट्र चिरनेर शाखेच्या व्यवस्थापनाने बँकेतील अपुर्‍या कर्मचारी संख्येचे कारण पुढे करत 9 आणि 10 फेब्रुवारी असे दोन दिवस बँक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बँक खातेदारांची गैरसोय निर्माण झाली आहे. एकंदरीत बँक ऑफ महाराष्ट्राच्या ढिसाळ कारभारामुळे जनमानसात संतापाची लाट उसळली आहे.

चिरनेर शाखेत येणार्‍या खातेदारांना बँकेतील उर्मटपणे वर्तन करणार्‍या कर्मचार्‍यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्यातच बँक ऑफ महाराष्ट्र चिरनेर शाखेच्या व्यवस्थापनाने बँकेतील अपुर्‍या कर्मचारी संख्येचे कारण पुढे करून दोन दिवस बँक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची नोटीस बँक ऑफ महाराष्ट्र चिरनेर शाखेच्या वतीने लावण्यात आल्याने खातेदारांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

Exit mobile version