ग्रामीण भागातील पुरग्रस्त मदतीच्या प्रतिक्षेत

। खेड । प्रतिनिधी ।
कोकणातील पुरग्रस्तांसाठी आता मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरु झालाआहे. देशभरातील विविध सामाजिक संस्था, राजकिय संघटना पुरग्रस्तांचे अश्रु पुसण्यासाठी सरसावलेआहेत मात्र विविध ठिकाणांहून येणारी मदत ही शहरी भागातच वाटली जात असल्याने पुरामुळे बाधीतझालेला ग्रामीण भाग आजही मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. ग्रामीण भागातील पुरग्रस्तांना खाण्याचे सोडापिण्याचे पाणीही मिळेनासे झाले असल्याने जगायचे कसे? हा प्रश्‍न त्यांच्यासमोर पडला आहे. गेल्या आठवड्यात कोकणात झालेल्या प्रलयकारी पावसाचा सर्वाधिक फटका हा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड आणि चिपळूण या दोन तालुक्यांना बसला. चिपळूण शहरालगत वाहणार्‍या शिव आणि वाशिष्ठी आणि खेड शहरालगत वाहणार्‍या जगबुडी आणि नारिंगी या नद्यांना आलेल्या महापुराने चिपळूण आणि खेड ही दोन्ही शहराना अक्षरश: धुवून काढले. महापुराचा फटका शहराबरोबरच लगतच्या गावानाही बसला. खेडतालुक्यातील अलसुरे, निळीक, चिंचघर, आंबवली, बिरमणी, पोसरे, चोरवणे तर चिपळूण तालुक्यातीलकळबस्ते, खेडी, दळवटणे, सती यासारखी गावे बाधीत झाली. या भागात असलेल्या बैठ्या घरांमध्येसुमारे 8 ते 10 फुट पाणी आल्याने घरातील जे काही होते ते सगळेच वाहून गेले.

नळपाणी योजना बाधीत झाल्याने पिण्याचे पाणीही मिळेनासे झाले. शहरातील पुर ओसरल्यावर शहरात मदतीचा ओघ सुरुझाला. मुबई, पुणे, ठाणे, याससारख्या ठिकाणांहून विविध सामाजिक संस्था, राजकिय संघटना,जिवनावश्यक वस्तू घेऊन कोकणात दाखल होवू लागले आहेत. मात्र येणारी ही मदत केवळशहरी भागातच वाटली जात असल्याने ही मदत ग्रामीण भागातील पुरग्रस्तांपर्यंत अद्याप पोहचलेलीच नाही.कोकणावर ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक संसार उद्धवस्त झाले आहेत. कालपर्यंत जे लोक इतरांना मदत करत होते त्यांना आता मदतीसाठी इतरांसमोर हात पसरावे लागत आहेत . निर्माण झालेल्या परिस्थितीतून सावरण्यासाठी सर्वच पुरग्रस्तांना मदतीची गरज आहे परंतू ही मदत स्विकारताना पुन्हा पुन्हा मदत आपल्याच पदरात पाडून घेण्यापेक्षा आपले अन्य बांधव जेआज मदतीचा प्रतिक्षेत आहेत त्यांना देखील मदत मिळायला हवी याचा विचार होणे गरजेचे आहे.

Exit mobile version