रविवारी होणार पुरस्कार वितरण सोहळा
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबागमधील प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय व तालुका ग्रंथालयाच्या ग्रंथपाल ज्योती म्हात्रे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ग्रंथपाल म्हणून त्यांनी महत्वपुर्ण भूमिका बजावल्याची दखल घेत त्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. रायगड जिल्हा ग्रंथालय संघातर्फे दरवर्षी उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा हा पुरस्कार प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय व तालुका ग्रंथालयाच्या ग्रंथपाल ज्योती म्हात्रे यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण रविवारी (दि.23) रायगड जिल्हा ग्रंथालय संघाच्या वार्षिक अधिवेशनात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
ज्योती म्हात्रे या अलिबागमधील रहिवासी असून प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालयात ग्रंथपाल म्हणून गेल्या 28 वर्षापासून त्या सेवा करीत आहेत. तरुणांसह अनेक मंडळींमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी त्यांचे प्रयत्न राहिले आहेत. शाळकरी मुलांपासून स्पर्धा परिक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना मुबलक पुस्तकांचा साठा उपलब्ध व्हावा, यासाठीदेखील त्या प्रयत्नशील राहिल्या आहेत.