| रसायनी | प्रतिनिधी |
पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात गेली अनेक दशके भरीव योगदान देणारे ज्येष्ठ पत्रकार रमेश भोळे यांना प्रतिष्ठेचा ‘इंटरनॅशनल अचिव्हर्स अवॉर्ड’ जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या या राष्ट्रीय स्तरावरील सन्मानामुळे रायगड जिल्ह्यातील पत्रकारितेच्या वतुर्ळात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे. ‘साईचे सोबती’ या पुस्तकाचे ते लेखक आहेत. त्यांच्या लेखणीतून साकारलेल्या अनेक कथा आणि लेख दरवर्षी दिवाळी अंकांमधून तसेच ‘साईलीला’ या विशेष अंकांमधून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या साहित्यातून समाजप्रबोधन आणि माहितीचा प्रसार सातत्याने होत असतो. तसेच, त्यांच्या प्रदीर्घ आणि समर्पित पत्रकारिता क्षेत्रातील कार्याची दखल घेत, त्यांना आता ‘इंटरनॅशनल अचिव्हर्स अवॉर्ड’ जाहीर करण्यात आला आहे. हा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा येत्या पत्रकार दिनी, म्हणजेच 6 जानेवारी रोजी शिर्डी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपत्र होणार आहे.






