नेने फाऊंडेशन,सोबतीतर्फे पुरस्कार वितरण

 पेण | वार्ताहर |

बापूसाहेब नेने फाउंडेशन व सोबती संघटनेमार्फत देण्यात येणार्‍या पुरस्कार सोहळयाचे वितरण नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य श्रीकांत कल्लुरकर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते  पाच शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार देण्यात आला. तर सोबती संघटनेमार्फत विविध क्षेत्रात काम करणार्‍या पाच मान्यवरांना देखील सोबती आदर्श व्यक्तीमत्व पुरस्कार देउन सन्मानित केले.
 यावर्षी  दीपश्री पोटफोडे,  बल्लाल ढवळे, कल्पेश शिंदे, संगीता माने,  डॉ. महानंदा म्हात्रे,  रचना म्हात्रे, प्रविण वसंत पाटील , विजय पाटील, प्राचार्य मनोज पाटील,  विद्या घरत आदींना  पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरुप शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रक्कम 2500 रूपये असा होते. सोहळयासाठी   बापुसाहेब नेने,   शुभांगी नेने, अ‍ॅड. मंगेश नेने,  बापूसाहेब आठवले,  बाळासाहेब जोशी, डॉ.निता कदम, अदी उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निलेश म्हात्रे व ज्योती राजे यांनी केले. तर आभार संयुक्ता टेमघरे यांनी व्यक्त केले.

Exit mobile version