| पनवेल । वार्ताहर ।
आगरी युथ फोरमतर्फे डोंबिवली येथे आयोजित 18 वा आखील भारतीय आगरी मोहोत्सवात बोली या आगरी भाषेतील कथासंग्रहास स्व. नकुल पाटील स्मृती आगरी साहित्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार आगरी साहीत्य क्षेत्रात अत्यंत मानाचा समाजला जातो. शिक्षक आ. बाळाराम पाटील यांच्या हस्ते लेखक अरविंद पाटील यांचा हा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
सदर प्रसंगी आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाबराव वझे, आगरी महोत्सव कमिटीचे उपाध्यक्ष विश्वनाथ रसाळ व सर्व कमिटी सदस्य, माजी नगराध्याक्ष जे एम म्हात्रे, अॅड. पी सी पाटील, मराठी साहित्य परिषद पुणेचे कार्यवाह प्रकाश पायगुडे, ज्येष्ठ साहित्यीक सुरेश देशपांडे, मंजिरी फाटक, दिपाली काळे, अनंत शिसवे, म. वा. म्हात्रे, नवनाथ ठाकूर, हनुमान संते जयश्री पाटील, शर्मिला म्हात्रे, आदी मान्यवर व हजारोंच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.






