| उरण | प्रतिनिधी |
पाणदिवे, उरणचे रहीवासी सुप्रसिद्ध शिवव्याख्याते सह्याद्रीरत्न धिरेंद्र ठाकूर यांना या वर्षीचा राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. ॲड. महेश मधुकर ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अलिबाग येथे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या राज्यभरातील गुणीजनांचा आ. भाई जगताप, आ. जयंत पाटील, प्रा. डॉ. गणेश ठाकूर यांच्या उपस्थितीत शिवव्याख्याते धिरेंद्र ठाकूर यांना सन्मानित करण्यात आले. सन्मानाची शाल प्रशस्तीपत्रक आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. शिवव्याख्याते म्हणून गेले कित्येक वर्ष शिवविचारांचा जागर विविध कॉलेज, शाळा, मंडळे, तालुके, जिल्ह्यात ते करत आहेत. कधीही गड न पाहिलेल्या शेकडो श्रोत्यांनी त्यांच्या व्याख्यानाने प्रेरित होऊन रायगडाचे दर्शन घेतले. हे त्यांच्या व्याख्यानाचं विशेष मानलं जातं. शिवजयंतीच्या दिवशी सलग चार-पाच व्याख्यान देण्याचे भूषणावह काम ते करत आहेत.







