| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांना स्पोर्ट्स बिझनेस लीडर ऑफ द इयर 2023 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सोशल मीडियावर ही माहिती देताना बीसीसीआयने म्हटले की, हा सन्मान भारतीय क्रीडा प्रशासनातील कोणत्याही व्यक्तीला मिळालेला पहिला सन्मान आहे. त्यांच्या या कृतीने खेळ पूर्णपणे बदलला आहे. जय शाह यांच्या नेतृत्वाने क्रिकेटजगतात छाप सोडली. पुरुषांच्या वर्ल्ड कप स्पर्धेला नवीन उंचीवर नेणे, वेतन समानता प्रस्थापित करणे आणि महिला प्रीमियर लीग, ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याच्या मार्गावर अग्रगण्य अशा अनेक उपक्रम आहेत, ज्याने खेळ कायमचा बदलला आहे.