| उरण | वार्ताहर |
यमुना सामाजिक, शैक्षणिक संस्था शेलघर यांच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या महाराष्ट्रातील एकूण 12 महिलांना ‘यमुना स्त्री सन्मान पुरस्कार’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यात उरण तालुक्यातील वेश्वी गावाची सृष्टी राजश्री राजेंद्र मुंबईकर मर्चंड नेव्ही मेरी टाईम इंडस्ट्रीज या क्षेत्रात जागतिक दर्जाच्या मर्क्स कंपनीच्या दळणवळणाच्या समुद्री जहाजावर सहा महिन्यांचे यशस्वी प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र प्राप्त केले. तसेच, मेरी टाईम इंडस्ट्रीजच्या जगभरातील प्रवासाकरिता आणि संपूर्ण जगाच्या कानाकोपर्यातील समुद्रावर स्वार होण्याकरिता सीफेरर हा परवाना प्राप्त झालेली आगरी समाजातील पहिली सागरी कन्या ठरली. म्हणून तीला पनवेल महानगर पालिका आयुक्तगणेश देशमुख, पनवेल महानगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, डॉ. गिरीश गुणे, महेंद्र घरत, अतुल पाटील या मान्यवरांच्या हस्ते ‘यमुना स्त्री सन्मान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.







