। म्हसळा । वार्ताहर ।
डॉ. विठ्ठल जाधव यांच्या उपस्थितीत शेखर मुंदडा संस्थापक महा एनजीओ फेडरेशन अध्यक्ष व महाराष्ट्र गोसेवा आयोग यांचे हस्ते तृषाली जाधव राष्ट्रीय अध्यक्षा शांतिदूत परिवार यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार 2024 पुरस्काराने गौरवण्यात आले. या आधीही राजभवन मुंबई येथे महाराष्ट्र राज्यपाल यांच्या हस्ते तृषाली जाधव यांना स्त्रीशक्ती राष्ट्रीय पुरस्कार, समाज रत्न पुरस्कार, सुर्यादत्ता सूर्यभारत सूर्यगौरव पुरस्कार, शांतिदूत सेवरत्न, नांदेड सिव्हिल न्यायाधीश यांच्या हस्ते इंटरनॅशनल अचीवर्स अवॉर्ड फ्रॉम इंटरनॅशनल ह्यूमन राइट्स कमिशन, समाज गौरव पुरस्कार वासमती वेल्फेअर फाउंडेशन, ट्रायबल एज्युकेटर पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. याप्रसंगी महा एनजीओ फेडरेशनचे ज्येष्ठ संचालक मुकुंद जी शिंदे, राहुल जगताप उपस्थित होते.