अरविंद आसबे यांना पीएचडी प्रदान

। पुणे । प्रतिनिधी ।

पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील बाभूळगावचे रहिवासी अरविंद भारत आसबे यांना डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाकडून प्राचीन भारत इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र या विभागातून पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.

अरविंद आसबे यांनी राजगड किल्ला आणि सभोवतालच्या भागाचा पुरातत्त्वीय अभ्यास या विषयावर संशोधन करत प्रबंध सादर केला होता. राजगड किल्ल्याचे मराठाकालीन कालखंडाचे महत्त्व, पुरातत्त्वीय उपलब्ध असलेल्या वास्तू आणि उत्खननातून मिळालेल्या अवशेषांवरून पुराव्यानिशी सदर शोधनिबंध त्यांनी अभ्यासले आहे. याकरिता मार्गदर्शक म्हणून विभाग प्रमुख प्रो. डॉ. पी. डी. साबळे आणि सह मार्गदर्शक म्हणून डॉ. सचिन जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. अरविंद आसबे हे नॅशनल मेरीटाईम हेरिटेज कॉम्प्लेक्स, लोथल, गुजरात येथे असिस्टंट क्युरेटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल डेक्कन कॉलजचे कुलगुरू प्रो. डॉ. प्रमोद पांडे आणि प्र-कुलगुरू प्रो. डॉ. प्रसाद जोशी आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

Exit mobile version