| खांब | प्रतिनिधी |
सध्या सर्वत्र हळूहळू पसरत चाललेल्या ॲनिमिया आजाराबाबत पथनाट्यातून जनजागृतीचा कार्यक्रम रोहा तालुक्यातील श्रमिक विद्यालय चिल्हे येथे संपन्न करण्यात आला.
धाटाव औद्योगिक वसाहतीतील दिपक नायट्रेट कं.व दिपक फाऊंडेशन रोहा यांच्यावतीने सदरील प्रबोधनात्मक पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्याध्यापक दिपक जगताप व दिपक फाऊंडेशनचे पदाधिकारी अजय आवाडे, डॉ. प्रियांका धनावडे, अश्विनी म्हसकर, उत्कर्षा सार्लेकर, मारूती निगडे, अंकिता ठाकूर व पथनाट्य सादर करणारे कलाकार देवेश्री नागवेकर, पूनम म्हात्रे, प्रकाश सप्रे, रणजित घरत, संजोग पाटील, संचित पानसरे, अंनिस पानसरे, हिमालया चोरघे आदी उपस्थित होते. या पथनाट्यातून ॲनिमिया का होतो? कसा होतो ? त्यावरील उपाय व घ्यावयाची काळजी याबाबत पथनाट्यातून जनजागृती केली.
ॲनिमियाचा आजार कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, या कामी दिपक फाऊंडेशन फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून जनजागृतीचे काम अतिशय चांगले पद्धतीने चालले आहे.
रणजीत घरत,
पथनाट्य कलाकार







