बोर्ली येथ एड्सबाबत जनजागृती

| अलिबाग | प्रतिनिधी |
जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग , जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग, रायगड व प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने मुरुड तालुक्यातील बोर्ली येथे एचआयव्ही एड्स व लैंगिक आजाराबाबत लोककलेचा माध्यमातून जनजागृती करण्यात आली. व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, डापकूचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय माने यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली स्थलांतरित कामगार व स्थानिक युवकांना तसेच नागरीकांना लैंगिक आजाराबाबत चे सविस्तर मार्गदर्शन प्रिझम संस्थेच्या कलापथकाच्या माध्यमातून केले.

काही शंका असल्यास शासकीय टोल फ्री क्रमांक 1097 या नंबर वर कॉल करुन माहीत मिळवावी हे देखील पथनाट्य द्वारे सांगण्यात आले. या कार्यक्रमास समीर धांडूरे, राजेंद्र चुणेकर, स्वाती संजय नाईक – आशा सेविका, उन्नती विवेक कचरेकर, जयवंत दमळेकर यांसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. या पथनाट्याचे नेतृत्व प्रिझमच्या तपस्वी गोंधळी यांनी केले. यावेळी शीतल म्हात्रे या देखील उपस्थित होत्या. सदर पथनाट्यात सार्थक गायकवाड, प्रगती कासार, पार्थ म्हात्रे, श्रुती नाईक, राज पाटील, यश म्हात्रे, स्वरांगी मोहरे आदी कलाकार सहभागी झाले होते.

Exit mobile version