। तळा । वार्ताहर ।
तळा येथे तहसील प्रशासनाकडून ईव्हीएम मशीनबाबत जनजागृती करण्यात आली. राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका लागण्याची शक्यता असून, या निवडणुकीत मतदान करताना नागरिकांना कोणत्याही प्रकारची शंका वाटू नये यासाठी व ईव्हीएम मशीनसंदर्भात पसरत असलेल्या अफवा तसेच नागरिकांचा ईव्हीएम मशीनबाबत असलेला गैरसमज दूर करण्यासाठी तळा शहरातील तळा बसस्थानक येथे तहसील प्रशासनाकडून ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या होत्या. या ठिकाणी नागरिकांना प्रत्यक्ष ईव्हीएम मशीनचे बटण दाबून तपासणी करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार नागरिकांनी प्रत्यक्ष ईव्हीएमचे बटण दाबून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड होत नसल्याची खात्री करून घेत ईव्हीएमबाबत समाधान व्यक्त केले. याप्रसंगी तळा तलाठी अंकिता झाडे, तलाठी धायगुडे, कदम, मारुती अडखले, पोलीस कर्मचारीे आदी उपस्थित होते.