पथनाट्यातून शासकीय योजनांविषयी जनजागृती

| अलिबाग | प्रतिनिधी |

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग, जिल्हा नियोजन कार्यालय, रायगड, अलिबाग जिल्हा माहिती कार्यालय, रायगड यांच्या माध्यमातून आयोजित पथनाट्यातून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची जनजागृती स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था, रोहा यांच्यावतीने अलिबाग बसस्थानक, अलिबाग समुद्रकिनारा, बामणगाव अशा विविध गावांमध्ये करण्यात आली. यावेळी नागरिकांना ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’, ‘माझी कन्या भाग्यश्री’, ‘मुद्रा लोन योजना’, ‘कौशल्य विकास योजना’, ‘घरकुल योजना’ अशा विविध योजनांची माहिती कलाकारांनी दिली. पथनाट्याचे नेतृत्व तपस्वी गोंधळी यांनी केले. पथनाट्यात कलाकार म्हणून सुचित जावरे, कोमल परब, अंजली पेडणेकर, वैष्णवी पाटील, सायली ठाकूर, जान्हवी ठाकूर, महिमा शिपाई, तन्वी कदम आदी सहभागी झाले होते.

Exit mobile version