प्लॅस्टिक कचरा विषयक जागरुकता

। कोर्लई । वार्ताहर ।

जागतिक महासागर दिनानिमित्ताने भारतीय मत्स्य सर्वेक्षणच्या मुंबई बेसने रत्नागिरी येथील मत्स्यविज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सागरी प्लास्टिक कचरा या विषयावर जागरूकता कार्यक्रम तसेच भाषण स्पर्धा घेण्यात आली. तसेच, मिरकरवाडा बंदरावर जागरूकता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

भारतीय मत्स्य सर्वेक्षण मुंबई बेसचे इन्चार्ज अशोक कदम यांनी प्रोजेक्ट बद्दल आणि समुद्रातील प्लास्टिक कचरा याबद्दल माहिती देताना प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत आणि विद्यार्थ्यांनी त्यात विशेष भूमिका निभावावी, असे सांगितले. तसेच, भाट्ये मिर्‍या येथील पांढरा समुद्रकिर्‍यावर प्राध्यापक अनिरुद्ध अडसूळ यांनी महासागराच्या पूजेचे तथा किनारा स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मुंबई बेसच्या टीमने विद्यार्थ्यांसोबत समुद्रकिनारा स्वच्छ केला. तसेच, महासागरातील प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी जागरूकता रॅलीचे आयोजन मिरकरवडा बंदर ते मच्छी मार्केटपर्यंत विद्यार्थी आणि मच्छीमारांच्या सहकार्याने काढण्यात आली.

या निमित्ताने आयोजित भाषण स्पर्धेमध्ये 10 स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता. यात प्रथम पारितोषिक गोविंद चौधरी, दुसरे बक्षीस चांदणी दत्त तर, तिसरे बक्षीस शिवकन्या सोनवणे यांनी पटकावले. स्पर्धेतील विजेत्यांना चषक व रोख बक्षिसे देण्यात आली. यावेळी डॉ. डबीर पठाण, डॉ. अनिरुद्ध अडसूळ, डॉ. सन्देश पाटील, डॉ. राहुल सदावर्ते हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. देवानंद उईके, स्वप्नील शिर्के, हर्षवर्धन जोशी, संजीव कुमार आणि मुजावर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Exit mobile version