बालविवाहाबाबत आदिवासींचे प्रबोधन

समाज सेविका तृषाली जाधव यांचा पुढाकार

| आंबेत | वार्ताहर |

म्हसळा तालुक्यातील एकूण 21 आदिवासी वाडींमधील समाजामध्ये होणारा बालविवाह यावर आदिवासींचे प्रबोधन व्हावे याकरिता समाज सेविका तृषाली जाधव यांनी तालुका विधी सेवा समिती श्रीवर्धन-म्हसळा यांना म्हसळा आदिवासी समाजात येऊन प्रबोधन केले.

मध्यंतरी काही आदिवासींकडून आदिवासी समाजाची दिशाभूल केली होत असल्याचेदेखील त्यांनी उघड केलं होते. ज्यामध्ये आदिवासी भारताचा नागरिक नाही, त्याला कुठलाही कायदा लागू होत नाही असे भ्रम पसरविले होते. यावर समाजात जनजागृती करण्यासाठी तृषाली जाधव आणि इतर होतकरूंनी यामध्ये पुढाकार घेऊन समाजात प्रबोधनाचे कार्य केले आहे. यावेळी न्यायाधीश अ.सी. साटोटे, अ‍ॅड. वावेकर, अ‍ॅड. ठोसर, मिस्टर अ‍ॅड. मिसेस अ‍ॅड. दातार, अ‍ॅड. साप्ते, अ‍ॅड. विठोबा पाटील, सरकारी वकील मुकेश पाटील, म्हसळा सह. पोलीस निरीक्षक संदीप कहाळे, अ‍ॅड. तेजस ठाकूर, क्लर्क अलोक श्रीवर्धनकर, म्हसळा पोलीस हवालदार संतोष चव्हाण, नलावडे, मुल्ला व आदिवासी वाडी म्हसळा, चिचोंडा व मेहंदडी गावातील आदिवासी बांधव, भगिनी उपस्थित होत्या.

Exit mobile version