| रसायनी | वार्ताहर |
जागतिक आदिवासी दिन सर्व समाजबांधव, संघटना, संस्था, मंडळे, वाड्या, पाडे मोठ्या उत्साहाने, गुण्यागोविंदाने साजरा करत असतात. देशात आदिवासी महिलांची नग्न धिंड काढणारी अमानवीय घटना, समान नागरी कायद्यातून वगळणे अशा अनेक घटनेचा निषेध करत, सरकारकडून आदिवासी धर्मकोड मिळणे, 9 ऑगस्ट दिनी सार्वजनिक सुट्टी जाहीर करणे, तालुक्यात आदिवासी भवन असणे, अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदा अधिक कडक करणे, पुनर्वसन करणे, दैनंदिन जीवनातील पायाभूत सुविधांची समस्या कायमस्वरूपी दूर करणे, आश्रमशाळा, वसतिगृह यांच्या संख्येत वाढ करणे, अल्पवयीन विवाह थांबविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, आदिवासी जमिनीवर बिगर आदिवासी समाजाचे असलेले अतिक्रमण निष्कासित करून आदिवासींना त्यांच्या जमिनी त्यांच्या ताब्यात देण्याची उपाययोजना करणे, अशा अनेक बाबीवर आम आदमी पार्टी नेते विलास घरत यांनी रसायनीतील लाडीवली येथील आदिवासी वाडीमध्ये जनजागृती करत पोषक आहार वाटून आदिवासी दिन साजरा केला.
यावेळी आम आदमी पार्टी कोकण नेते विलास घरत, रसायनी अध्यक्ष राम पवार, विष्णू वाघे, वामन मुकणे, मधुकर पवार, रुक्मिणी जाधव, बेबी पवार, राधा मुकणे, मनीषा वाघे आदी मान्यवर उपस्थित होते.