मुंबईत मतचोरी विरोधात जनजागृती

युवक काँग्रेसचे मेट्रो व लोकलमध्ये अभियान

| मुंबई | प्रतिनिधी |

देशात निवडणूका निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे, पण लोकशाहीच्या या महत्त्वाच्या स्तंभावर संशयाचे ढग जमा झाले आहेत. भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करत असल्याचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दाखवून दिले आहे. या मतचोरीविरोधात मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्त्वाखाली युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मुंबई मेट्रो आणि लोकल ट्रेनमध्ये माहिती पत्रके वाटत मतचोरीविरोधात जनजागृती केली.

मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन आणि पदाधिकाऱ्यांनी घाटकोपर ते साकीनाका व अंधेरी ते गोरेगाव मार्गावर मेट्रो आणि लोकलमधून प्रवास करून प्रवाशांशी संवाद साधत निवडणूक आयोग व भाजपाच्या मतचोरीची पर्दाफाश केला. याबाबतची माहितीपत्रके वाटून लोकांमध्ये जगजागृती करत त्यांना वोटचोरीची माहिती दिली. लोकशाहीच्या रक्षणासाठी जागरूक नागरिकांनी या वोटचोरीविरोधी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी लोकशाही व संविधान रक्षणासाठी लढत आहेत. निवडणूक आयोगाचा भ्रष्ट कारभारही त्यांनी पुराव्यासह उघड करून लोकशाहाचा गळा घोटण्याऱ्यांचा पर्दाफाश केला आहे. राहुल गांधी यांच्या संघर्षात युवक काँग्रेस पूर्ण ताकदीने उभी असून मतचोरीविरोधी जनजागृती करत आहोत, असे मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष झीनत शबरीन यांनी सांगितले.

Exit mobile version