रेल्वे स्थानकात जनजागृती मोहीम

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत शहरातील अभिनव ज्ञान मंदिर शाळेच्यावतीने कर्जत रेल्वे स्थानकात जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना लोहमार्ग पोलीसांच्या माध्यमातून बाळ अत्याचारबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांच्या आदेशान्वये ‘खाकीतील सखी’ या योजने अंतर्गत महिला आणि मुलींच्या सुरक्षेच्या अनुषंगाने कचरा व्यवस्थापन व आरोग्य स्वच्छता जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

कर्जत रेल्वे स्थानकात आयोजित करण्यात आलेल्या जनजगृती मोहिमेत अभिनव ज्ञान मंदिर शालेचे 35 ते 40 विद्यार्थी सहभागी झाले होते. खाकीतील सखी या योजनेअंतर्गत महिला व मुलींच्या सुरेक्षाच्या संदर्भात या शाळेतील मुलांनी पदनाट्य सादर केले. या कार्यक्रमासाठी कर्जत लोहमार्ग पोलीस ठाण्याकडून स्टेशन प्रबंधक प्रभास लाल, आरपीएफ आयपीएफ रणवीर सिंग आणि लोहमार्ग पोलीस वरिष्ठ निरीक्षक मुकेश ढगे तसेच, मुख्याध्यापक धुराजी शिंदे, अनिल गलगले तसेच अशोक रोकडे, जयमाला जांभळे, संजय देसले, सुजित देशमुख आदी उपस्थित होते.

Exit mobile version