ग्राहक दिनानिमित्त विद्यार्थ्यांचे प्रबोधन

नागाव हायस्कूल येथे जनजागृती

| अलिबाग | प्रतिनिधी |

राष्ट्रीय ग्राहक दिन नागाव रहिवासी संघ संचालित संचालक हायस्कूल नागाव येथे 24 डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला. यावेळी निरीक्षक वैध मापन शास्त्र अलिबाग विभाग यांच्या वतीने ग्राहक जागृती अभियान राबवून विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना निरीक्षक बा.भि. चव्हाण यांनी ग्राहक संरक्षण कायदा आणि ग्राहकांचे हक्क व कर्तव्य याविषयी संपूर्ण माहिती दिली. तसेच ग्राहक म्हणून लोकांची होणारी फसवणूक कशी टाळायची, आवेष्टित वस्तू खरेदी करताना काय सावधगिरी बाळगावी, वजन आणि माप याचे प्रमाण व योग्यता याविषयी सविस्तर मार्गदर्शन करून शालेय मुलांना इलेक्ट्रॉनिक काटे, काऊंटर मशीन, वजने, मापे यांची प्रात्यक्षिके दाखवली.

यावेळी अरुण पवार क्षेत्र सहायक, किशोर नाईक ग्राहक प्रतिनिधी, नागाव हायस्कूलचे मुख्याध्यापक अजित पाटील, जगदीश चोरगे, चंद्रकांत गिरी, मोहन पाटील, मनोज कासार, तनिष्का नाईक, मंजुषा पाटील, मीनल सावंत यांच्यासह विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Exit mobile version