चला जाणूया नदीला या अभियानातंर्गत जनजागृती प्रभातफेरी आयोजन

| पेण | प्रतिनिधी |
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त राज्यातील 75 नदयांना अमृत वाहिनी करण्याचे संकल्प महाराष्ट्र शासनाने घेतले असून पेण मधील भोगावाती नदीचा त्यामध्ये समावेश आहे. म्हणून आज उपविभागीय कार्यालय पेण यांच्या मार्फत चला जाणूया नदीला भोगावती नदी संवादयात्रा या शुक्रवारी पेण शहरामध्ये जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रभात फेरीमध्ये कनिष्ठ महाविदयालयातील विदयार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पेण शहरात पेण एज्युकेशन सोसायटी व महाराष्ट्र शिक्षण संस्था या दोन शैक्षणिक संस्थांच्या जनजागृती प्रभात फेरींचे आयोजन करण्यात आले होते. पहिली प्रभात फेरी प्रायव्हेट हायस्कूल पेण येथून निघून छत्रपती शिवाजी चौकातुन, महावीर मार्ग, मिर्ची गल्ली, लाल बहादुर शस्त्री मार्ग वरुन महात्मा गांधी मंदीर या प्रभात फेरीचे नेतृत्व प्रा.उदय मानकवळे यांनी केले होते.

तर दुसरी प्रभात फेरी महाराष्ट्र शिक्षण संस्था प्रवेशद्वारावरून पांका पाटील चौक मार्गे राजू पोटे मार्ग, धरमतर रोड मार्गे महात्मा गांधी मंदीर या प्रभात फेरीचे नेतृत्व प्रा.संदेश मोरे केले. या दोन्ही प्रभात फेर्‍या महात्मा गांधी वाचनालयाच्या आवारात एकत्र आल्या. त्यानंतर त्या ठिकाणी सदर अभियानाचे महत्त्व सांगण्यात आले आणि नंतर या प्रभात फेरीची सांगता करण्यात आली.

या प्रभात फेरीमध्ये पेण तहसिदार स्वप्नाली डोईफोडे, पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड. मंगेश नेने, नायब तहसिलदार प्रसाद कालेकर, नितीन परदेशी, प्रसाद म्हात्रे, मोरे, सुरेंद्र ठाकूर, शिवाजी चव्हाण, कुलदीप काठकर सौ. जोशी, सौ. पटवर्धन, प्रा.उदय मानकावळे, लालन पाठारे, प्रा.संदेश मोरे, आदि उपस्थि होते.

Exit mobile version