| तळा | प्रतिनिधी |
तळा विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या द. ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील सहभागी स्वयंसेवकासाठीची उद्बोधन कार्यशाळा शनिवार (दि.13) सप्टेंबर रोजी संपन्न झाली. या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून रायगड जिल्हा समन्वयक प्रा. तुळशीदास मोकल उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. दत्ता कुंटेवाड यांनी केले. कार्यशाळेचे निवेदन प्रा.भरत चाळके यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार डॉ.राजाराम थोरात यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







