मनिका बात्राची जबरदस्त कामगिरी

। पॅरिस । वृत्तसंस्था ।

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सोमवारी (दि.5) टेबल टेनिसपटू मनिका बात्रा हिने जागतिक क्रमवातील 10व्या क्रमांकावर असलेल्या रोमानियाच्या बेर्नाडेट्टे शेजॉक्स हिचा पराभव करून धक्कादायक निकाल नोंदवला. भारत-रोमनिया सामना 2-2 बरोबरीत असताना पुन्हा एकदा अनुभवी मनिकावर भारतीयांच्या अपेक्षाचे ओझे आले. मनिकाने आपल्या जबरदस्त खेळाने तो विश्‍वास सार्थ ठरवला आणि भारताला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवून दिला.

टेबल टेनिसच्या दुहेरी गटाच्या पहिल्या सामन्यात भारताच्या अर्चना कामथ व श्रीजा अकुला या जोडीने रोमानियाच्या एलिझाबेथ समारा व एडिना डिएकोनू जोडीचा 11-9, 12-10, 11-7 असा पराभव करून 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सर्वांच्या नजरा महिला एकेरीत मनिका आणि शेजॉक्स यांच्या लढतीकडे वळल्या. या सामन्यात रोमानियन खेळाडू सहज वर्चस्व गाजवेल, असा अनेकांचा अंदाज होता..पण, मनिकाने सर्वांचे अंदाज चुकवले आणि 11-5, 11-7, 11-7 असा एकतर्फी विजय मिळवून भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.

Exit mobile version