। नेरळ । प्रतिनिधी ।
ज्योविस आयुर्वेच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील सर्वांचे शारीरिक आजार पळवून लावण्याचा विडा आम्ही उचलला आहे. आयुर्वेद औषध वापरून केले जाणारे उपचार याला मेडिकल सायन्समध्ये मोठे महत्व आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील सलग 33 शिबिरे घेवून आम्ही प्रयत्न करीत आहोत, असा विश्वास आयुर्वेदाचार्य डॉ. राज सातपुते यांनी व्यक्त केला. कर्जत तालुक्यातील जांभीवली येथे आयुर्वेद आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते, त्यावेळी डॉ. सातपुते बोलत होते. यावेळी 235 रुग्णांची तपासणी डॉ. सातपुते यांच्यासह डॉ. मणिशंकर, डॉ. हर्षदा चव्हाण, डॉ. साहिल काटेमोरे, डॉ. प्राजक्ता कराळे, डॉ. आकांक्षा वाळके, डॉ. दत्ता गिराम, डॉ. कोमल सोलंकी यांनी केली.