चिरनेरमध्ये आयुर्वेदिक शिबीर संपन्न

| चिरनेर | वार्ताहर |

फिलान हर्बो मेडिक्स प्राव्हेट लिमिटेडच्या वतीने चिरनेर येथे आयुर्वेदिक आरोग्य शिबिराचे उद्घाटन चिरनेर गावातील श्रीराम मंदिराच्या सभा मंडपात शुक्रवार दि.5 रोजी रमेश फोफेरकर यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. नजम अली कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिरात नाडी परीक्षणाद्वारे आजारांचे निदान करण्यात आले. किशोर भगत संदीप लकडे, आर.के. म्हात्रे यांनी शिबिराचे व्यवस्थापन केले होते. या शिबिरास परिसरातील नागरिक, आबालवृद्ध, शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आरोग्य तपासणी करून घेतली. या आयुर्वेदिक शिबिरात थायरॉईड, मुतखडा, मुळव्याध, मधुमेह, कावीळ, दमा, सर्दी, खोकला, सांधेदुखी, गुडघेदुखी, वातरोग, चर्मरोग, पोट वाढणे, स्त्रियांचे आजार, अपचन, केस गळणे, डोकेदुखी, दंत विकार आदी रोगांची तपासणी करण्यात आली.

याप्रसंगी किशोर भगत, प्रगती भगत, डॉ. नजम अली कादरी, अविनाश म्हात्रे, समीर डुंगीकर, तर भास्कर मोकल, सचिन घबाडी, धनाजी नारंगीकर आदी उपस्थित होते.

Exit mobile version